Advertisement

ठाण्यातील मॉडेलला कॉलनीत आग

ठाणे पश्चिमेकडील बांधकाम सुरू असलेल्या निवासी इमारतीला ही आग लागली.

ठाण्यातील मॉडेलला कॉलनीत आग
SHARES

मंगळवारी, ९ फेब्रुवारी रोजी मुलुंड चेक नाका जवळील मॉडेलला कॉलनीत आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, ठाणे पश्चिमेकडील बांधकाम सुरू असलेल्या निवासी इमारतीला ही आग लागली. अग्निशमन दलाचे काम सुरू आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एमएमआर विभागात आज आगीची ही तिसरी घटना आहे.

यापूर्वी आज मुंबईतील वर्सोवा इथं भीषण आग लागली होती. मासळी बाजारा जवळील चार मजली इमारतीत ही घटना घडली. वृत्तानुसार, दुपारी अडीचच्या सुमारास ही आग लागली. दुसरीकडे, ज्या इमारतीत आग लागली होती, ती इमारत शिवसेनेच्या इमारतीच्या समोरील होती.

दरम्यान, आगीत अनेक दुकानं भस्मसात झाल्याची माहिती असूनही कोणतीही जखमी झालेली नाही. कूलिंग ऑपरेशन सुरू असल्यानं आगीचे कारण अद्याप समजू शकलं नाही.

मंगळवारी दुपारी नवी मुंबईत तळोजा भागातील केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग हळूहळू इतर ठिकाणी पसरत होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागताच केमिकल फॅक्टरीतून स्फोटांचे आवाज येऊ लागले.

(सविस्तर वृत्त लवकरच)



हेही वाचा

मॅक्सी कॅब धोरणनिश्चितीसाठी समितीची नेमणूक

समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवण्याच्या प्रकल्पाला मान्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा