Advertisement

वरळीत नेरोलॅक पेन्टच्या गोदामाला आग

वरळी येथील श्रीराम मिल जवळच्या नेरोलॅक पेन्टस या गोदामाला भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

वरळीत नेरोलॅक पेन्टच्या गोदामाला आग
SHARES

सोमवारी सकाळी वरळी येथील एका गोदामाला भीषण आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. ही लेव्हल दोनची आग आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.

आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

वरळी येथील श्रीराम मिल जवळच्या नेरोलॅक पेन्टस या गोदामाला भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या गोदामात रंगाचं साहित्य ठेवण्यात आलं होतं.
या परिसरात नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे या परिसरात वाहतूक कोंडीची स्थिती उद्भवली आहे.


चेंबूरमध्ये आग

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच चेंबूरमधील माहुलगाव परिसरातील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लांटमध्ये स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या स्फोटात एकूण ४३ जण जखमी झाले होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा