Advertisement

नेपियन्सी रोडवरील 'या' इमारतीला आग

दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोडवरील अॅटलास या ६ मजली इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

नेपियन्सी रोडवरील 'या' इमारतीला आग
SHARES

दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोडवरील अॅटलास या ६ मजली इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यांवरील फ्लॅटचं मोठं नुकसान झालं आहे. आगीची माहिती मिळताच घटस्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग नियंत्रणात आणली.

या इमारतीला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलानं स्पष्ट केलं. पहाटे ४ वाजून ४१ मिनिटांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर अचानक आग लागली. फ्लॅट क्रमांक ६१मधील इलेक्ट्रिक्स वायर आणि फर्निचरनं भराभर पेट घेतल्यानं दुसऱ्या मजल्यावर आगीचं तांडव झाले होते. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीची झळ पोहोचली. 

दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये अग्नितांडव निर्माण झाल्यानं त्यांची एकच धावपळ उडाली. सर्वांनी अंगावरील कपड्यानिशी जीवमुठीत घेऊन इमारतीच्याबाहेर धाव घेतली. यावेळी वयोवृद्धांना इमारतीच्या खाली आणताना येथील रहिवाश्यांची दमछाक झाली. आग प्रचंड भयानक असल्यानं आगीमुळं इमारतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील अनेक फ्लॅट जळून खाक झाले आहेत.

पहाटे ५ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास सुरुवात केली. यावेळी अग्निशमन दलाने इमारतीत अडकलेल्या २ महिलांना सुखरूप बाहेर काढले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर म्हणजे ८ वाजून ४० मिनिटांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. या आगीत इमारतीचे अनेक फ्लॅट जळून खाक झाले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा