Advertisement

वांद्र्यातील निवासी इमारतीला भीषण आग


वांद्र्यातील निवासी इमारतीला भीषण आग
SHARES

वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी चर्चजवळील ला मेर या निवासी इमारतीच्या 13 व्या मजल्याला दुपारी 1 वाजेच्या दरम्यान आग लागली. ही आग भीषण असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ला मेर ही 17 मजली इमारत असून या इमारतीच्या 13 व्या मजल्याला मंगळवारी दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी आग लागली. 

या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. यात 4 फायर इंजिन, 4 वॉटर टँक आणि एक रुग्णवाहिकेचा समावेश आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

विशेष म्हणजे या इमारतीत अभिनेत्री एश्वर्या राय हिचे देखील घर आहे. सध्या तिथे तिची आई आणि भाऊ हे दोघेही राहतात. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा