Advertisement

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याजवळील इमारतीला लागली आग


शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याजवळील इमारतीला लागली आग
SHARES

सोमवारी संध्याकाळी वांद्रे येथील बँडस्टँड परिसरातील एका उंच इमारतीच्या १४ व्या मजल्यावर आग लागली आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत निवासस्थानाजवळ असलेल्या जीवेश बिल्डिंगमध्ये संध्याकाळी 7:46 वाजता आग लागली.

मुंबई अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, 8 फायर इंजिन, 7 जेटी, 1एडीएफओ, 1 डीएफओ घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.

आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. या प्रकरणात अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा