Advertisement

कमला मिल आगीचे लाइव्ह अपडेट


कमला मिल आगीचे लाइव्ह अपडेट
SHARES

लोअर परळ इथल्या कमला मिल परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. घटनास्थळी असणाऱ्या अग्निशमन दलाच्या 8 फायर इंजिन, 5 जे. टी आणि 5 वॉटर टँकरच्या मदतीनं आग विझवण्यात आली आहे. पण यात 14 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

कमला मिल्समधल्या ट्रेड हाऊस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री 12.30 च्या दरम्यान भीषण आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या इमारतीच्या टेरेसवर रेस्टॉरेंट आणि पब देखील आहे. त्यात या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबुचे बांधकाम होते. त्यामुळे आग आणखी वाढत गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 



मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता

या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 14 जखमींना केईएम तर दोन जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायन रुग्णालयातल्या जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये 12 मुलींचा तर 3 मुलांचा समावेश आहे. हे सर्व कुलाबा परिसरातील राहणारे असल्याचं समोर येत आहे. 



असा आहे घटनाक्रम

5:45 - दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार- मुख्यमंत्री




3:58 - युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे घटनास्थळी दिली भेट

3:56 -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला दिली भेट. 

3:56 - आरोपींनी देशाबाहेर पळ काढू नये, म्हणून पासपोर्ट कार्यालयाला सूचना

3:46 - 13 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, फक्त एक रुग्ण केईएम रुग्णालयात

2:47 - शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे घटनास्थळी दाखल

2:40 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली. 

2:33 - पालिकेच्या जी दक्षिण विभागाचे वॉर्ड ऑफिसर प्रशांत सपकाळे यांची बदली

2:30 - मुंबई महानगर पालिकेचे ५ कर्मचारी निलंबित. जी दक्षिणचे मधुकर शेलार, धर्मराज शिंदे, वडगिरे, अग्निशमन दलाचे एस. एस. शिंदे यांचे निलंबन. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली माहिती.

2:17 - रितेश संघवी, जिगर संघवी, अभिजीत मानका या आरोरींविरोधात भादंवि कलम 304, 337, 38, 34 नुसार गुन्हा दाखल, तिन्ही आरोपी भायखळात राहणारे, आतापर्यंत 15 जणांचे जबाब ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी नोंदवली. पहिल्यांदा 'वन अबव्ह' पबला आग लागली, मग ती 'मोजोस ब्रिस्टोल'पर्यंत पसरली.

2.05 - मोजोस ब्रिस्टोलनं आता या घटनेसंदर्भात स्पष्टीकरण देत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.   

2:04 - या घटनेत जखमींची संख्या 55 वर गेली असून यामध्ये 30 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे. तर जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. 

01.17pm- तक्रारीनंतरही कारवाई न झाल्यानं मुंबई पोलीस पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करणार. 

12.22pm - या घटनेतील मृतांचे शवविच्छेदन करण्यात आलं आहे. त्यानुसार या आगीत कोणीही जळाले नसून सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला. 


12:10 - 

12.08 pm- भाजपाचे खासदार किरीट सोमैय्या यांनी पालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. 

11.51 - या आगीच्या घटनेसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तसंच या घटनेची चौकशी करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  


11:41 - 



11:40 - केईएममधल्या 12 जखमींना डिस्चार्ड    

4:30 - 


4:04 - मृतांच्या आकडा 14 वर, मृतांमध्ये 12 मुलांचा तर 3 मुलींचा समावेश

3:38 - 14 जणांचा मृत्यू तर 16 जखमी, दोघा जखमींना सायन रुग्णालयात दाखल 

3:28 - 2 जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू, दोघांची प्रकृती चिंताजनक

3:22 - आग पूर्णपणे विझल्यानंतर महापालिका जागेची पाहणी करून पुढील कारवाई करणार

3:20 - महापालिका जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्यासह आमदार सुनील शिंदे, 

          नगरसेवक आशिष चेंबूरकर, समाधान सरवणकर घटनास्थळी दाखल 



3:11 - 14 जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक

3:00 - मृतदेह जळाल्यामुळे त्यांची ओळख पटत नाही

2:56 - 11 जणांचा मृत्यू तर 14 जखमी

2:36 - गुदमरून अनेकांचा मृत्यू, मृतांमध्ये मुलींचा आकडा अधिक

2:30 - 10 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता




2:23 -  9 जणांचा मृत्यू आणि 12 जखमी झाल्याची माहिती

2:10 - केईएम रुग्णालयाकडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

2: 03 - केईएम रुग्णालयाकडून 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती 

1:57 - केईएम रुग्णालयात 12 जखमींवर उपचार सुरू असल्याची केईएमचे डॉक्टर निखिल यांची माहिती

1:55 - ट्रेड हाऊस सेंटर इमारतीतल्या तिसऱ्या मजल्यावरील आग इमारतीच्या टेरेसपर्यंत पसरली

1:48 -  8 जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं

12:30 - ट्रेड हाऊस सेंटरमधल्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग


परिसरातील कार्यालयाचं नुकसान

कमला मिलमध्ये अनेक कार्यालये आहेत. याच परिसरात टाईम्स नाऊ, टीव्ही 9, झूम टीव्ही आणि रेडिओ मिर्ची ही देखील कार्यालये आहेत. आग इतकी भीषण आहे की, इतर कार्यालयांमधील फायर अलार्म वाजला. त्यानंतर इथली सर्व कार्यालये रिकामी करण्यात आली आहेत. टाईम्स नाऊ, मिरर नाऊच्या कार्यालयामध्ये धूर पसरला आहे. या आगीत आजूबाजूच्या अनेक कार्यालयांचं नुकसान झालं आहे. टाईम्स चॅनल्सचे ब्रॉडकास्टिंग थांबवण्यात आलं आहे.  




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा