Advertisement

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या इमारतीला आग


करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या इमारतीला आग
SHARES

दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर यांच्या मुंबईतील धर्मा प्रोडक्शनच्या इमारतीला मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत महत्त्वाची पुस्तके, कॉस्च्युम आणि इतरही साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.


बारा गाड्या दाखल

मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर ही आग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यत पसरली. मात्र इमारतीचे खूपच नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या बारा गाड्यांमार्फत ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.


प्रचंड नुकसान

धर्मा  प्रोडक्शनच्या अंतर्गत तयार झालेल्या आणि येणाऱ्या फिल्मचे साहित्य म्हणजेच कॉस्च्युम, पुस्तके जळून खाक झाले आहेत. धर्मा  प्रोडक्शनअंतर्गत 'स्टुडेंट ऑफ द ईअर 2', हा चित्रपट १० मे ला रिलीज होणार आहे. याआधी करण जोहरचा 'कलंक' चित्रपट रिलीज झाला होता. याचबरोबरचे आगामी प्रोजेक्ट्सवर काम चालू होते. पण य आगीमुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा