Advertisement

ठाण्यातील बायोसेल कंपनीत भीषण आग

ठाण्यातील वागळे इस्टेटमधील बायोसेल कंपनीला शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे.

ठाण्यातील बायोसेल कंपनीत भीषण आग
SHARES

ठाण्यातील वागळे इस्टेटमधील बायोसेल कंपनीला शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे.

वागळे इस्टेट परिसरातील औद्योगिक क्षेत्रात प्रशांत स्वीट कॉर्नरच्या गोडाऊनजवळ ही कंपनी आहे. बायोसेल कंपनीत लागलेली ही आग भीषण असून कंपनीतून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत आहेत. आगीचे कारण अजून समजलेले नाही. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचं काम सुरू आहे.

कंपनीचा तळमजला आणि पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. संध्याकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास ही आग लागली. Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा