SHARE

गोरेगाव पूर्वेकडील कामा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये शनिवारी सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी आग लागली. रस्त्यावरील ट्रान्सपोर्ट लाॅजिस्टीक गाळ्याला आग लागली. ही आग काही मिनिटांत चांगलीच पसरली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासांतच आगीवर नियंत्रण मिळवत, पुढील काही वेळातच आग विझवली.

आग विझली असली तरी या आगीत कामा इंडस्ट्रिय इस्टेटमधील अंदाजे १५ गाळ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवानं कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या