Advertisement

वसईतील परफ्यूम आणि प्लास्टिक कंपनीला आग

वसईतील एका परफ्युम आणि प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली.

वसईतील परफ्यूम आणि प्लास्टिक कंपनीला आग
(Representational Image)
SHARES

वसईतील एका परफ्युम आणि प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. वसईतल्या शास्रीकर पाडा इथं ही कंपनी आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलीस दाखल झाले.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल झाल्या असून, या आगीत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती समोर येत आहे. परंतु कंपनीचे नुकसान झालं आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

ही आग गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लागल्याची माहिती समोर येत आहे. परंतू, अद्याप ही आग कशी लागली याच कारण अस्पष्ट आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा