Advertisement

'त्या' टाक्यांचा हिशोब कुणाकडे?


'त्या' टाक्यांचा हिशोब कुणाकडे?
SHARES

कुलाबा- मुंबईच्या भूगर्भात तब्बल ६६ ब्रिटिशकालीन पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्या आता अग्निशमन दलाकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. टाक्यांची तपासणी करून त्याचा वापर करणे योग्य आहेत की नाही, याची शहानिशा करण्याची जबाबदारी अग्निशमन दल, कीटकनाशक विभाग आणि जल विभागावर सोपवण्यात आली आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी त्याचा अहवाल आठवडाभरात मागवला आहे.

मुंबईच्या भूगर्भात कुलाब्यापासून माहीमपर्यंत 10 बाय 10 मीटर लांबी, रुंदी आणि 3 मीटर खोलीच्या एकूण 66 टाक्या आहेत. सन 1982 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या टाक्या मुंबई महापालिकेला हस्तांतरित केल्या होत्या. परंतु, या टाक्यांचा वापर होत नसल्याने त्या तशाच पडून होत्या. परिणामी सन 2013 मध्ये त्यांची दुरुस्ती करणे महापालिकेने थांबवल्याचे महापालिका जल विभागाचे सहाय्यक अभियंता जीवन पाटील यांनी सांगितले.

दरम्यान "या टाक्यांबाबत पालिका आयुक्त निर्णय घेत आहेत. सद्यस्थितीत त्या कोणाला द्यायच्या याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र अग्निशमन दलाला मिळाल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल", असे पालिका अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहानदळे यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा