Advertisement

अंधेरीतील मधूर इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग


अंधेरीतील मधूर इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग
SHARES

अंधेरी (पूर्व) मधील मधूर इंडस्ट्रीयल इस्टेट येथील इमारतीमध्ये मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


कशामुळे लागली आग?

मधूर इंडस्ट्रीयल इस्टेट येथील इमारतीमध्ये सकाळी भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि चार पाण्याचे टँकर्स घटनास्थळी पोहोचले. मात्र अगीचे लोळ वाढू लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या आणखी गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.

मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश आलेलं नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं म्हटलं जात असलं तरी नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या आगीत एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. शिवाय मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय