खारघरमध्ये मारुती सुझुकीच्या शोरूमला भीषण आग, दोन ठार

 Kharghar
खारघरमध्ये मारुती सुझुकीच्या शोरूमला भीषण आग, दोन ठार
Kharghar, Mumbai  -  

खारघर येथील आदित्य प्लॅनेट इमारतीतल्या मारूती सुझुकीच्या शोरूमला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत शोरुमच्या दोन सुरक्षारक्षकांचा होरपळून मृत्यू झाला. कृष्ण कुमार आणि जितेंद्र कुमार अशी मृतांची नावे आहेत. यासह शोरूममधील मारुती सुझुकीच्या नव्या कोऱ्या 8 ते 10 गाड्या जळून खाक झाल्यात.

आग लागलेल्या इमारतीमधील सर्व कुटुंबियांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. खारघर सेक्टर 10 मध्ये सायन-पनवेल हाय-वेच्या जवळ आदित्य प्लॅनेट इमारत आहे. या इमारतीच्या बेसमेंटला मारुती सुझुकीचं शोरुम आहे. पहाटे पाचच्या सुमारास शोरूममधून धूर निघताना स्थानिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी तातडीनं आग विझवण्याचं काम हाती घेतलं.

Loading Comments