कांदीवलीच्या क्रांतीनगरमध्ये आग

 Kandivali
कांदीवलीच्या क्रांतीनगरमध्ये आग

कांदीवली - क्रांतीनगर येथील लोखंडवाला जवळ एका मीटर बॉक्सला शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास आग लागली. ही आग अचानक लागल्याने आजूबाजूच्या परिसरात थोडासा गोंधळ उडाला. मात्र वेळीच आग विझल्याने कोणतीही हानी झाली नाही. आग आजूबाजूच्या दुकानातील लाकडी फर्निचरला लागू नये म्हणून दुकानदारांनी काही वेळासाठी दुकानं बंद केली होती. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.

Loading Comments