Advertisement

राधा कृष्ण मालिकेच्या सेटला आग


राधा कृष्ण मालिकेच्या सेटला आग
SHARES

स्वास्तिक प्रोडक्शन्सच्या राधा कृष्ण या मालिकेच्या सेटला गुरुवारी रात्री आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.
मालिकेचे निर्माता सिद्धार्थ कुमार तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेचा सेट महागड्या सेट पैकी एक आहे. ही भारतीय संस्कृतीतील अजरामर प्रेम कहाणी आहे. यामध्ये राधा-कृष्णाच्या प्रेमकथेचं भव्य सादरीकरण होणार आहे.


आगीवर नियंत्रण

या मालिकेत सुमेद मुदगलकर आणि मल्लिका सिंह यांची प्रमुख भूमिका आहे. ही मालिका अतिशय भव्य प्रमाणावर तयार केली असून तिच्या निर्मितीत असंख्य लोकांचा हातभार आहे. या मालिकेविषयी आपले विचार मांडत असताना ते म्हणाले लोकांचा जीव आपल्यासाठी मौल्यवान असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा