Advertisement

'फायर रोबो' करणार अग्निशमन दलाची मदत

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ‘फायर रोबो’ दाखल करण्यात आला आहे. या रोबोमुळं अग्निशमन दालाचे जवान ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत तिथं या रोबोची मदत घेण्यात येणार आहे.

'फायर रोबो' करणार अग्निशमन दलाची मदत
SHARES

दिवसेंदिवस मुंबईत आगीच्या घटना प्रचंड वाढत आहे. अनेकदा भीषण आग लागल्यामुळं तिच्यावर नियंत्रण मिळवताना आग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावर बेतत. त्यामुळं अशा आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ‘फायर रोबो’ दाखल करण्यात आला आहे. या रोबोमुळं अग्निशमन दालाचे जवान ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत तिथं या रोबोची मदत घेण्यात येणार आहे. या रोबोची किंमत सुमारे १ कोटी रुपये असून, भारतातील हा पहिला रोबो आहे.

.३० तास कामाची क्षमता

या फायर रोबोतून वरच्या दिशेला ३८ अंश आणि खालच्या दिशेला ३० अंश कोनात पाण्याचा मारा करता येतो. या रोबोमध्ये एकावेळी २.३० तास काम करण्याची क्षमता आहे. हा रोबो वायरलेस रिमोटच्या साहाय्यानं दीड मीटर प्रतिसेकंद या वेगानं ३०० मीटरपर्यंत चालवता येऊ शकतो. तसंच, प्रतिसेकंद ८० लिटर पाणी फेकण्याची क्षमता याच्यात आहे. हा फायर रोबो ५३ इंच लांब आणि ४४ इंच उंच असून, त्याचं वजन ५२० किलो आहे.

कॉम्प्युटरच्या माध्यमातून सूचना

या रोबोवर कॉम्प्युटरच्या माध्यमातून सूचना देऊन काम करून घेतलं जाणार आहे. हा रोबो अडगळीच्या ठिकाणी जाऊन आग विझवू शकणार असल्यामुळे आग भडकण्याचं प्रमाण कमी होणार आहे. रोबोच्या पुढे-मागे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसंच, नाइट व्हिजन आणि थर्मल इमेजिंग कॅमेरेही आहेत. रोबोमध्ये असलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीनं घटनास्थळी असणारी आगीची तीव्रता समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळं आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करणं शक्य होणार आहे.

प्रादेशिक समादेश केंद्र

बोरिवली प्रादेशिक समादेश केंद्राचे उद्घाटनप्रसंगी बुधवारी हा रोबो सेवेत दाखल झाला. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. नव्यानं सुरू झालेल्या या प्रादेशिक समादेश केंद्राच्या अंतर्गत गोरेगाव, मालाड, कांदिवली, चिंचोली, दहिसर, दिंडोशी व कांदरपाडा अग्निशमन केंद्रांचा समावेश आहे.

वायरलेस रिमोटची रचना

फायर रोबोमध्ये असलेल्या इन्फ्रारेड सेन्सर आणि डबल वॉटर कर्टनमुळं रोबोचं तापमान नियंत्रणात राहू शकतं. तसंच ऑब्स्टॅकल्स अव्हॉयडन्स सेन्सरमुळं रोबोला अडथळ्यांतून मार्ग काढण्यास मदत होणार आहे. जॉय स्टीक, स्टियरिंग लॉक, ऑब्स्टॅकल अव्हायडन्स, रोबो वर-खाली करण्याकरता लो स्पीड बटन, रेकॉर्डिग बटन, वॉटर मॉनिटर बटन, कॅमेरा जॉयस्टिक, चार अँटेना अशी वायरलेस रिमोटची रचना आहे.हेही वाचा -

जागा वाटपावरून युतीत पुन्हा कलगीतुरा?

बायोमेट्रीक हजेरीविरोधात महापालिका कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा