अग्निशमनदलाची अग्नि प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबत जनजागृती

 CST

See all

अग्निशमन दलाच्या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने सीएसटी स्थानकांत मुंबईकर नागरिकांमध्ये अग्नि प्रतिबंधात्मक जनजागृतीसाठी अग्निसुरक्षा उपाययोजनांचे प्रदर्शन भरवले आहे.

या प्रदर्शनात अग्निशमन दलाचा इतिहास चित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. तसेच काळाप्रमाणे अग्निशमन दलात होत असलेल्या बदलावर दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या सेवेत नव्याने दाखल झालेली अत्याधुनिक उपकरणे दाखवण्यात येत असून, त्यांचा उपयोग कसा केला जातो, याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.

आग लागल्यास आणि आग लागू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी काय खबरदारी व उपाय योजना कराव्यात याची माहिती देखील या प्रदर्शनातून देण्यात आली आहे. मुंबईकर या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद देत असून, आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत. 17 एप्रिल पर्यँत मुंबईकरांना हे प्रदर्शन पाहता येईल.

Loading Comments