Advertisement

मानखुर्दच्या आगीत भंगाराचे गोदाम जळून खाक


मानखुर्दच्या आगीत भंगाराचे गोदाम जळून खाक
SHARES

रविवारी दुपारी मानखुर्द येथील मंडाळा परिसरात भंगाराच्या गोदामाला आग लागल्याने परिसरात एकच पळापळ सुरू झाली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीच्या लोळांनी आणि धुराने परिसर व्यापून गेला होता. या आगीत ३ ते ४ मोठे गोदाम जळून खाक झाल्याचं म्हटलं जात आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही मनुष्यहानी झाली नाही. अग्निशमन विभागाने मोठ्या मुश्कीलीने ही आग आटोक्यात आणली.


मालाचं मोठं नुकसान

ही आग शॉक सर्किटमुळे लागल्याचा प्रथमिक अंदाज असला, तरी अद्याप आग लागल्याचं कारण अधिकृतरित्या समजलेलं नाही. ही आग इतकी भीषण होती की एकूण १० ते १५ अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण तोपर्यंत ३ ते ४ गोदामं जळाली होती. गोदामातील माल पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडल्याने गोदाम मालकांचं मोठं नुकसान झालं आहे.



केमिकलमुळे अडचण

या परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकल, भंगार आणि कापडांचे उद्योग चालतात. त्यामुळे अग्निशमक दलाला आग विझवण्यासाठी तेथील केमिकलमुळे मोठी अडचण येत होती. ही आग भडकू घेउ नये यासाठी अग्निशमक दलाच्या जवांनानी काळजी घेऊन आग विझवली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा