Advertisement

'खड्डे दर्शना'ला सुरुवात!


'खड्डे दर्शना'ला सुरुवात!
SHARES

मुंबईतील रस्त्यांवर यंदा खड्डे पडणार नाही, असा दावा प्रशासनाने केल्यानंतरही अनेक रस्त्यांवर खड्डयांचे दर्शन होत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या डागडुजीची कामे करण्यात आली तसेच हमी कालावधीतील कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने खड्डे पडणार नसल्याचे प्रशासनाने छाती ठोकून सांगितले. प्रत्यक्षात मात्र, सेवा सुविधांसाठी कंपन्यांनी खोदलेल्या चरींचेच आता खड्डयांत रुपांतर झाल्याने हे खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे.

मुंबई महापालिकेने यंदा 583 प्रकल्प रस्त्यांची दुरूस्ती करून त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये 1048 कामे हाती घेतली. त्यातील 579 कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला. तर उर्वरीत न झालेली कामांची जबाबदारी नेमलेल्या कंत्राटदाराची राहणार आहे. त्यामुळे यंदा रस्त्यांवर फारसे खड्डे दिसणार नाही, असा दावा केल्यानंतरही भांडुप, दादर, घाटकोपर, कांदिवली आदी भागांमध्ये खड्डयांचे दर्शन मुंबईकरांना घडले.


येथे पडलेत खड्डे... 

दादर पश्चिम भागात कोतवाल उद्यानाशेजारी टिळकनगर पुलाच्या सिग्नलजवळ, तर भांडुपमध्ये जंगलमंगल रोड, क्वॉरी रोडवर खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे विविध कंपन्यांनी खोदलेल्या चरींचे रुपांतर खड्डयांमध्ये झाले आहे. दादरमध्ये खोदलेली चर बुजवण्यात आली होती. परंतु याच ठिकाणी मोठा खड्डा पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. जंगलमंगल रोड तसेच टेंभीपाडा रोडवरही चरींमुळेच खड्डेसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक रहिवासी आणि मनसेच्या माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या लक्षात ही बाब आणूनही त्यांनी येथील चर योग्य प्रकारे न बुजवल्यामुळे येथे मोठा खड्डा निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर हे याच रस्त्यावरून जातात. एकाबाजूला भाजपा आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नगरसेवक असूनही त्यांना हा खड्डा बुजवता येत नाही, अशी टीका त्यांनी केली.



चरी का खोदतात?

दूरध्वनी, विद्युत सुविधा, पाईपलाईन गॅस यासारख्या विविध 20 बाह्य उपयोगीतांसाठी (External Utilities) आवश्यकतेनुसार रस्त्यांवर चर (Trenches) खोदली जाते. चर खोदण्यासाठी विहीत शुल्क भरल्यानंतर महापालिका परवानगी देते आणि आकारलेल्या शुल्कातून चर बुजवण्यासाठी कंत्राटराची नेमणूक करते. हे कंत्राटदार मग खोदलेले चर बुजवण्याचे काम करतात. चर बुजवल्यानंतर पुढील तीन वर्षे त्यांचा हमी कलावधी असतो. त्यामुळे तीन वर्षात त्याठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास महापालिकेला नि:शुल्क तो बुजवून देणे कंत्राटदाराला बंधनकारक असते. 1 ऑक्टोबर 2017 ते 15 मे 2018 या कालावधीत उपयोगितांशी संबंधित ज्या संस्थांना त्यांच्या आवश्यकतेनुसार रस्त्यावर चर खोदण्याची परवानगी हवी असेल, त्यांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने 15 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावे, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.


का पडतात रस्त्यांवर खड्डे ?

  • डांबर आणि पाणी यांचे वैर.
  • डांबरी रस्ता बनवताना लेव्हल आणि रोलर नीट न फिरवल्यास
  • रस्त्यावरील अवजड वाहनांमधून अतिरिक्त वजनाची वाहतूक त्यामुळे रस्ते उखडण्यास मदत
  • वारंवारच्या पावसाने डांबर वाहून जाते
  • पावसात खड्डे बुजवल्यास ते योग्यप्रकारे बुजत नाही.
  • पावसाच्या पाण्यातही खड्डे बुजवता यावेत म्हणून कार्बनकोर, कोल्डमिक्स, हॉटमिक्स अशा विविध तंत्राचा वापर. पण अयशस्वी.
  • दगडविटा, गोण्यांचा वापर करून तात्पुरते खड्डे बुजवले तरी खड्डे पडतच राहतात.


खड्ड्यांबद्दल काय म्हणतायत मुंबईकर...

पहिल्या पावसानंतर मुंबईत खड्डेदर्शनाला सुरुवात होताच मुंबईकरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. पण एरवी कॅमेऱ्यांसमोर राग व्यक्त करणाऱ्या मुंबईकरांनी यावेळी ट्विटरवरही आपला संताप व्यक्त केला. 







हे देखील वाचा -

मुंबईकरांना यंदा पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते - आयुक्त अजोय मेहता

खड्डयांसाठी खराब रस्त्यांवर 400 कोटींची मलमपट्टी



डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा