राज्यातली पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया मुंबईत!

  Andheri
  राज्यातली पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया मुंबईत!
  मुंबई  -  

  मुंबईतल्या रिलायन्स हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये नुकतीच राज्यातली पहिली रोबोटिक्स किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. 59 वर्षांच्या मुरलीधरन यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना किडनीचा त्रास होत होता. गेल्या दीड वर्षापासून ते किडनीच्या आजारावर उपचार घेत होते. अखेर त्यांच्यावर 2 जुलै रोजी ही शस्त्रक्रिया करण्यात आली.


  मुरलीधरन यांच्यावर पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया

  मुरलीधरन हे मुंबईतील अंधेरी परिसरात राहतात. त्यांची किडनी निकामी झाली होती. त्यांच्या पत्नीनेच त्यांना किडनी देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर रिलायन्स हरकिसनदास रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबियांनी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. 2 जुलैला मुरलीधरन यांच्यावर राज्यातील पहिली रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णालयाचे डॉ. इंदरबिर गिल यांच्या पथकाने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. 


  राज्यातली पहिली रोबोटिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा मला आणि माझ्या टीमला आनंद होतोय. रुग्ण, किडनी देणारा दाता यांची प्रकृती उत्तम आहे. ही शस्त्रक्रिया पूर्णत: यशस्वी झाली आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर रक्तस्त्रावही कमी होतो, शस्त्रक्रियेनंतर संसर्ग(Infection) होण्याची शक्यताही कमी असते.

  डॉ. इंदरबिर गिल, सर एच. एन. हिरानंदानी फाउंडेशन रुग्णालय


  रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय?

  कोणत्याही मानवापेक्षा अधिक अचूकपणे रोबोट्स शस्त्रक्रिया (ऑपरेशन्स) करतात. जिथे डॉक्टर नाहीत, अशा ठिकाणीही ही रोबोटिक पद्धत उपयुक्त ठरते. तसेच दुर्गम ठिकाणी असलेल्या डॉक्टरांशी संवाद साधणे आणि त्यांना सहाय्य करण्याचे काम हे शिक्षक करतात. विशेष म्हणजे या रोबोटिक पद्धतीच्या शस्त्रक्रियेत शरीरातील रक्त कमी प्रमाणात जाते आणि वेदनाही कमी होतात. रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याची शक्यताही कमी असते. 

  जगभरात काही निवडक रुग्णालयांतच रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाते. फक्त मुंबईकरांपर्यंतच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत रोबोटिक तंत्रज्ञान पोहचवायचे असल्याचे डॉ. गिल यांनी स्पष्ट केले आहे.


  किडनी देण्यापूर्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची प्रक्रिया समजून घेतली. आता ते सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगू शकतील.

  - लीना, मुरलीधरन यांच्या पत्नी

  रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे

  • कॅन्सरसह मूत्राशय, किडनी, हृदयविकार, स्त्रीरोगावरही शस्त्रक्रिया शक्य 
  • अगदी कमी वेळात होणारी शस्त्रक्रिया
  • सर्जरीच्या वेळी रुग्णाला कमी त्रास
  • कमीत-कमी रक्तस्त्राव
  • 7 दिवसांत रुग्ण घरी देखील जाऊ शकतो  हे देखील वाचा - 

  महापालिका रुग्णालयांमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.