SHARE

मच्छिमारांच्या मुलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, तटरक्षक दल आता मच्छिमारांच्या मुलांना संधी देऊ इच्छित आहे. त्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याबाबत सोमवारी वरळी भागात तटरक्षक दलाकडून विशेष मेळावा घेण्यात आला होता. या मेळ्याव्यात तटरक्षक दलानं सागरी सुरक्षेसंबंधी वरळी किनारपट्टीवर मच्छिमारांशी संवाद साधला.

विविध कार्यक्रम

२६/११ च्या हल्ल्यानंतर किनारपट्टी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. या कार्यक्रमातील मच्छिमार बांधवांशी चर्चा हा यामधील सर्वात मोठा व महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमार्तंगत मच्छिमारांमध्ये समुद्री घुसखोरी, बाहेरील नौका ओळखणं, संशयास्पद हालचाली ओळखणं तसेच, या सर्वांची वेळोवेळी सुरक्षा दलांना माहिती देणं, याबाबत मार्गदर्शन केलं जातं. तसेच त्यादृष्टीने प्रशिक्षितही केलं जातं.


कायम बेभरवशाचा

समुद्र हा कायम बेभरवशाचा असतोतो कधीही खवळू शकतोअशावेळी खोल समुद्रात असताना आपत्कालिन स्थिती निर्माण झाल्यास काय करावेयाबाबत या कार्यक्रमात तटरक्षक दलाकडून प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आलीजीवरक्षक जॅकेटचा वापर कसा करावाहे दाखविण्यात आलेयासाठी ३०० मच्छिमारांना जीवरक्षक जॅकेटचे मोफत वितरणही करण्यात आले.हेही वाचा -

जे.जे. उड्डाणपुलावर वेगमर्यादेमुळं प्रवासी नाराजसंबंधित विषय
ताज्या बातम्या