जे.जे. उड्डाणपुलावर वेगमर्यादेमुळं प्रवासी नाराज


SHARE

जे. जे. उड्डाणपुलावर होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहनांसाठी वेगमर्यादा घालण्यात आली होती. वेगमर्यादा घालण्याच्या या  नियमामुळं अपघातांवर नियंत्रण ठेवण्यात वाहतूक पोलिसांना यश आलं. मात्र, या नियमामुळं वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उड्डाणपुलावर एका वळणावर ताशी २० किमी, तर ५ वळणांवर ताशी ३० किमी वेगमर्यादा असल्यानं वाहनांना कोंडीत मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. या नियमांच पालन न केल्यास १ हजार रुपयांपर्यंतच्या ई-चलनाच्या दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागत आहे.

५३ हजारांहून अधिक चलान

वेगमर्यादेच्या या नियमानुसार, यंदाच्या वर्षी जानेवारीपासून तब्बल ५३ हजारांहून अधिक चलान जारी झाले आहेत. वेगमर्यादेला एक वर्ष होत आलं असताना, या मर्यादेविरोधात समाजमाध्यमांत विरोध वाढत आहे. वाहतूक विभाग आणि तज्ज्ञांनी मात्र यंदाच्या वर्षात जे.जे. पुलावर एकही अपघात झालेला नसल्याचा दाखला देत, वेगमर्यादेचं समर्थन केलं आहे.

ताशी ६० किमी वेग

या पुलावरून ताशी ६० किमी वेगाने सुरक्षितपणे जाता येत असताना २०-३० किमीची मर्यादा घालणं अव्यवहार्य, अनावश्यक आहे. तसंच, जे.जे. पुलामुळं मोहम्मद अली रोडवरील गर्दी टाळून अर्ध्या तासाचा प्रवास ५ मिनिटांत करता येतो. अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा आवश्यक असली, तरी ताशी केवळ २० किंवा ३०चं बंधन घालण्यापेक्षा, जरा अधिक वेगानं, मात्र जबाबदारीनं वाहन चालवणं शक्य आहे, असं प्रवाशांचं म्हणणं आहे. 

जेजे उड्डाणपुलावर पुलावर ताशी ५० किमीचं निर्बंध आहे . फक्त काही ठिकाणांच्या तीव्र वळणांवरच कडक वेगमर्यादा असल्याचं वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.हेही वाचा -

कन्फर्म! आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार, स्वत:च केली घोषणा

पीएमसी बँक गैरव्यवहारा प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखलसंबंधित विषय
ताज्या बातम्या