Advertisement

अंधेरी तहसिलदार कार्यालयावर निघणार मच्छीमारांचा धडक मोर्चा

मच्छिमारांना मिळणारे डिझेल तब्बल ३० रूपयांनी महाग झाले, त्यामुळं मच्छिमारी व्यवसाय धोक्यात आला आहे, अनेक मासेमारी नौका बंद झाल्या आहेत.

अंधेरी तहसिलदार कार्यालयावर निघणार मच्छीमारांचा धडक मोर्चा
SHARES

मच्छिमारांना मिळणारे डिझेल तब्बल ३० रूपयांनी महाग झाले, त्यामुळं मच्छिमारी व्यवसाय धोक्यात आला आहे, अनेक मासेमारी नौका बंद झाल्या आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार मच्छीमारांच्या प्रश्र्नावर गंभीर नाही, त्याच्या फटका मच्छीमारांना बसत आहे. याबाबत सरकारचे लक्ष वाढण्यासाठी वेसावे व परिसरातील सर्व मच्छीमारांची एक जाहीर सभा काल रात्री वेसावे बंदर किनाऱ्यावर झाली.

वेसावा कोळी जमात, नाखवा मंडळ तसेच येथील तिन्ही मच्छिमार सहकारी संस्था व सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थितीत तातडीने मच्छीमारांचा धडक मोर्चा अंधेरी तहसीलदार कार्यालयावर काढण्यात यावा असे एकमताने ठरविण्यात आले अशी माहिती मच्छीमार नेते प्रदिप टपके यांनी दिली.

गुरुवार २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अंधेरी तहसीलदार कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या धडक मोर्चात पारंपरिक वेशात  फार मोठ्या प्रमाणात मच्छीमार व कोळी महिला सहभागी होणार आहेत. या धडक मोर्चाचे नेतृत्व नाखवा मंडळ अध्यक्ष देवेंद्र काळे व वेसावे गावातील सर्व सहकारी संस्था करणार आहेत.

डिझेल भाववाढीतील तफावत कमी करावी, सवलती दरात मच्छीमारांना डिझेल मिळावे, राज्य सरकारने मच्छीमारांचे थकित डिझेल परतावे तातडीने द्यावेत, एलईडी पध्दतीने होणारी मासेमारी बंद करावी, १२० अश्र्वशक्ती वरिल मच्छीमार नौकांना डिझेल पुरवठा करावा, कोळीवाडे संरक्षित करावेत इत्यादी प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना  देण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा