Advertisement

महापालिका अनधिकृत फेरीवाल्यांना आकारणार 'इतका' दंड

मुंबईतील अनेक रस्ते, फुटपाथ, इतर ठिकाणी फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे.

महापालिका अनधिकृत फेरीवाल्यांना आकारणार 'इतका' दंड
SHARES

मुंबईतील अनेक रस्ते, फुटपाथ, इतर ठिकाणी फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. या फेऱ्यांमुळं पादचाऱ्यांना चालण्यास अडथळे येत असून वाहतुककोंडीही मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकदा या फेरीवाल्यांविरोधात तक्रारही करून झाली. मात्र, तरीही त्यांचं प्रमाण कमी झालेलं नाही. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेनं दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

५ हजारपर्यंत दंड

फेरीवाला धोरणांच्या अंमलबजावणीअभावी रस्ते, फूटपाथ अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. या फेरीवाल्यांना चाप लावण्यासाठी महापालिकेनं ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही कारवाई कधी सुरू होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळं मुंबईकरांना फेरीवाल्यांचा त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.

धोरणाची अंमलबजावणी

फेरीवाल्यांवर कारवाईसाठी महापालिकेने धोरण तयार केलं आहे. अद्याप या धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळं फेरीवाल्यांचं फावलं असून, मुंबईत ठिकठिकाणी फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात जागा व्यापल्या आहेत. संध्याकाळच्या सुमारास हे प्रमाण अधिक असते.

खासगी सुरक्षा व्यवस्था

महापालिकेनं त्यांच्यावर कारवाईसाठी खासगी सुरक्षा व्यवस्थेची मदत घेऊन दोन पाळ्यांत काम करावं, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी गुरुवारी विधी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. तसेच बेकायदा पार्किंगच्या ५ ते १० हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईच्या धर्तीवर १२०० ते १५०० रुपये दंड आकारावा, अशी सूचना केली. यावर प्रशासनानं याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.



हेही वाचा -

भाजप नेत्याची ‘गांधी शांती यात्रा’ मुंबईतून सुरू

मुंबईला पुरवत होते भेसळयुक्त दुध



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा