Advertisement

मुंबईतल्या उन्हामुळे फ्लेमिंगोंनी धरला घरचा रस्ता


मुंबईतल्या उन्हामुळे फ्लेमिंगोंनी धरला घरचा रस्ता
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला आहे. सोमवारसह मंगळवारीही मुंबईकरांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. जर मुंबईकरांना या उन्हाचा एवढा त्रास सहन करावा लागतो, तर याच कडाक्याच्या उन्हाचा त्रास पक्ष्यांना किती होत असेल? याचा आपण विचारही करू शकत नाही. याच वाढत्या तापमानाचा फटका फ्लेमिंगो पक्षांनीही बसतोय. फ्लेमिंगो पक्षांनीही बदलत्या वातावरणामुळे स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांना हवं असलेलं जेवण म्हणजेच शेवाळ आता या वातावरणात तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. तसंच हा काळ त्यांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे ते मुंबई सोडून आपल्या मायदेशी परतणं जास्त पसंत करतात.

आता उन्हाळा सुरू आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे फ्लेमिंगो पक्षी परतीच्या वाटेवर असतात. दिवसेंदिवस वातावरण बदलत आहे. तसेच फ्लेमिंगोचे जेवण शेवाळ इथे उपलब्घ होत नाही. म्हणून हे फ्लेमिंगो जिथून येतात तिथेच परत जातात. तसंच दुसरं कारण म्हणजे हा काळ फ्लेमिंगोंच्या प्रजननाचा काळ असतो. म्हणून ते जिथून येतात म्हणजेच नॉर्थ चायना तिथेच ते परततात. नॉर्थ चायना इथे आता त्यांच्यासाठी जेवण(शेवाळ) उपलब्ध आहे.’

अविनाश कुबल, प्राणीमित्र

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा