Advertisement

पुलाचे काम रखडल्याने प्रवासी त्रस्त


पुलाचे काम रखडल्याने प्रवासी त्रस्त
SHARES

दादर - दादर पश्चिमेला जोडणारा एकमात्र पादचारी पूल सध्या बंद असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. गेल्या चार महिन्यापासून पुलाच्या पश्चिमेकडील भागातील जिन्याची डागडुजी सुरू आहे. त्यामुळे जुन्या ब्रिटिशकालीन सपाट पुलाचा वापर प्रवासी करतायेत. पण चार महिने झाले तरी अजून जिन्यांचं काम पूर्ण का नाही झालं? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला.
"पादचारी पुलावरील जिने अतिशय धोकादायक बनले होते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडू नये म्हणून काही महिन्यापूर्वी हा पूल बंद करण्यात आला. या कामाची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठवड्यात कामाला सुरुवात होईल," असं महानगरपालिका मुख्य अभियंता एस. पी. कोरी यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय