Advertisement

कोरोना व्हायरसचा खाद्यतेलाला फटका, तेलाचे दर कोसळले

आंतरराष्ट्रीय बाजारात (Internation Market) खाद्यतेलाचे दर कोसळले आहेत.

कोरोना व्हायरसचा खाद्यतेलाला फटका, तेलाचे दर कोसळले
SHARES

कोरोना व्हायरसचा (Corona Virus) फटका आता खाद्यतेलाला देखील बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (Internation Market) खाद्यतेलाचे दर कोसळले आहेत. केंद्र सरकारनं मलेशियाकडून कच्च्या पाम तेलाची (Palm oil) आयात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आता करोना विषाणूच्या धास्तीची भर पडली असून मलेशिया (Malaysia) व इंडोनेशियातून (Indonesia) भारतात होणारी कच्च्या पाम तेलाची आयात पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळं अतिरिक्त साठा झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात (Internation Market) या तेलाचा दर कोसळले आहेत.

मुंबईतील तेलदरांवरही (Oil) याचा परिणाम झाला असून, येथील तेलदरांत घट झाली आहे. अशावेळी पाम तेलावरील अवलंबवित्व कमी करुन देशांतर्गत अन्य तेलाचा पुरेपूर वापर करण्याचा निर्णय खाद्यतेल असोसिएशननं (Edible Oil Association) केला आहे. यामुळे पुढील २ महिने तरी तेलाचे दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. मुंबईत दररोज खाद्यतेलाच्या एकूण वापरात पाम तेलाचे (Palm oil) प्रमाण ७० टक्के आहे.

देशाच्या एकूण तेल किंवा कच्च्या खाद्यतेलाच्या गरजेपैकी (ऑइल केक) ८० टक्के तेलाची आयात होते. हे प्रामुख्यानं पाम तेल (Palm oil) असून ते मलेशियाहून व काही प्रमाणात इंडोनेशियाहून आयात केलं जातं. काश्मिरसंबंधी तेथील पंतप्रधानांनी केलेल्या मलेशियातील आयात जानेवारीपासूनच बंद करण्यात आली. त्यामुळं इंडोनेशियाहून आयात सुरू झाली. परंतु आता करोनामुळे ती आयातदेखील थांबविण्यात आली. यामुळे जगभरातील तेल बाजारातील दर घसरले आहेत.

करोना व्हायरसमुळं इंडोनेशिया व मलेशियातून होणारी आयात थांबली असल्यानं त्याठिकाणी ऑइल केकचा (Oil Cake) माल तसाच पडून आहे. त्यातून सर्वत्रच दरात घट सुरू झाली आहे. भारतीय तेल बाजार (Indian Oil Market) बऱ्यापैकी पाम तेलावर अवलंबून असला तरी काश्मिरप्रश्नी मलेशियावर बहिष्कार घातला त्यावेळीच व्यापाऱ्यांनी या तेलाला स्वदेशी पर्याय तयार केला होता. त्यानुसार देशांतर्गत सरकीच्या तेलबियांचा पुरेपूर उपयोग करण्यात आला. हे तेल पाम तेलाला सक्षम पर्याय ठरले असून, यातूनच दरात घसरण झाल्याचं समजतं

सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानुसार (एसईए), मागील आठवडाभरात कच्चे पाम तेलाच्या आयात दरात ३.२१ टक्के घट झाली आहे. त्याआधीच्या आठवड्यात जवळपास ११ टक्के घट झाली होती. यामुळेच देशांतर्गत सर्वच तेलांच्या दरात २.४७ ते ५.११ टक्के घट एकाच आठवड्यात झाली. त्याआधीच्या आठवड्यात ही घट १० टक्क्यांच्या घरात होती.

खाद्य तेलाचे दर

तेल 
जानेवारी 
फेब्रुवारी 
सद्यस्थितीत
पाम 
९२-९४ 
९०-९२ 
८५-८७
सूर्यफुल 
१०२-१०५ 
१००-१०२ 
९८-१००
सरकी 
८६-८८ 
९०-९२ 
९१-९३
शेंगदाणा 
१२५-१५५ 
११५-१५५ 
११०-१४८
राईसब्रान 
९८-१०० 
९६-९८ 
९५-१०२



हेही वाचा -

ओला, सुकानंतर आता घातक कचराही वेगळं करणं बंधनकारक

भाऊचा धक्का ते मांडवा 'रो पॅक्स फेरी' सेवा लवकरच होणार सुरु



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा