Advertisement

ओला, सुकानंतर आता घातक कचराही वेगळं करणं बंधनकारक

महापालिकेनं घातक कचऱ्याचं (Hazardous waste) विलगीकरण रहिवाशांवर बंधनकारक केलं आहे.

ओला, सुकानंतर आता घातक कचराही वेगळं करणं बंधनकारक
SHARES

महापालिकेनं मुंबईकरांच्या सुरक्षेसह मुंबईच्या सरक्षेच्या दृष्टीनंही अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. काही महिन्यांपूर्वी महापालिकेनं (BMC) मुंबईकरांना ओला व सुका कचऱ्याचं वर्गीकरण करण्याचं आव्हान केलं होतं. याला रहिवाशांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचं अनेकदा निदर्शनास आलं आहे. मात्र. असं असताना आता महापालिकेनं घातक कचऱ्याचं (Hazardous waste) विलगीकरण रहिवाशांवर बंधनकारक केलं आहे. त्यामुळं ब्लेड, सुया, चाकू, खिळे, काचा, ट्युबलाइट आणि सॅनिटरी नॅपकीन असा घातक कचरा आता वेगळा साठवावा लागणार आहे.

ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देणं आता नागरिकांना बंधनकारक करण्यात आलं आहे. तर १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना (Society) ओला कचऱ्यापासून आपल्याच आवारात खतनिर्मिती करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

ओल्या व सुक्या कचऱ्याच्या संकलनासाठी व वहनासाठी आवश्यक तेवढं लहान व मोठे कॉम्पॅक्टर तसेच छोट्या बंद वाहनाची आणि तसेच एकाच गाडीत ओला व सुका कचरा वाहून नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तशीच स्वतंत्र व्यवस्था घातक कचऱ्यासाठीही (Hazardous waste) करण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनानुसार रोज उत्पन्न होणाऱ्या कचऱ्यापैकी ओला, सुका व घरगुती घातक कचरा (ब्लेड, ट्युबलाइटस्, सॅनिटरी पॅड्स) अशा ३ प्रकारे वर्गीकरण करावं लागणार आहे. आतापर्यंत घरगुती घातक कचरा गोळा करण्यासाठी वेगळा विभाग नसल्यानं सुक्या कचऱ्यातच घरगुती घातक कचरा गोळा करण्यात येत होता. परंतु प्रत्येक वाहनामध्ये बदल घडवून घरगुती घातक कचरा वेगळा गोळा करण्याची व्यवस्था करण्याचं प्रशासनानं ठरवलं आहे.



हेही वाचा -

महापालिकेकडून अंधेरी पश्‍चिम येथील नाल्यांची दुरुस्ती

भाऊचा धक्का ते मांडवा 'रो पॅक्स फेरी' सेवा लवकरच होणार सुरु



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा