• याला फुटपाथ म्हणायचं का?
SHARE

मुंबईच्या दादर पश्चिम येथील डी. वाय. देशपांडे मार्गावर असलेला फुटपाथ आता फुटपाथच राहिलेला नाही असे चित्र पाहायला मिळत आहे. कारण या फुटपाथची अक्षरश: चाळण झाली असून पेव्हरब्लॉक ठिकठिकाणी निखळलेले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.


याचसोबत या मार्गावर दोन ठिकाणी कामे सुरू असून विकासकांनी पादचारी मार्गच पूर्णपणे काबीज केल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. येथील चिंचोळ्या मार्गावर दोन्ही बाजूला पार्किंग होत असल्याने त्या मार्गावरून चालणेही शक्य होत नसल्याची खंत तिथल्या स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यात काही गाड्यांनी कित्येक वर्षांपासून जागा अडवून ठेवल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न उद्भवला आहे. रस्त्यावरून चालताना कधीही अपघात होऊ शकतो, अशी स्थिती उद्भवल्याची प्रतिक्रिया देखील तिथल्या स्थानिकांनी दिली.

या विभागात पालिकेचे अॅडव्हन्स लोकॅलिटी मॅनेजमेंट (एएलएम) देखील कार्यरत आहे. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी 1998 साली लोकसहभागातून डी. वी. देशपांडे मार्ग येथे 'इकोवॉर' या एएलएमची स्थापना करण्यात आली. 79 वर्षांचे विश्वास नवलकर हे या इकोवॉर एएलएमचे अध्यक्ष आहेत.


आज या विभागात असलेल्या पदपथाची दुरवस्था झाली आहे. पण कोणताही सरकारी बाबू किंवा लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे इकोवॉर एएलएमच्या अंतर्गत येणाऱ्या आमच्या परिसराची अवस्था अत्यंत वाईट होत चालली आहे.

विश्वास नवलकर, अध्यक्ष, इकोवॉर एएलएम

यावर पालिकेचे एएलएम अधिकारी सुभाष पाटील यांना विचारले असता एएलएमसंदर्भात कोणतीही अडचण असेल तर, त्यांनी पालिकेच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधायला हवा. पण इकोवॉर एएलएमची कोणतीही तक्रार आजवर आमच्यापर्यंत आली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. सोबतच 'मुंबई लाइव्ह'ने लोकांपर्यंत पोहोचून स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल त्यांनी 'मुंबई लाइव्ह'चे आभारही मानले.हेही वाचा -

पाटण मंडल एएलएमची पार्किंगच्या विळख्यातून सुटका कधी?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या