Advertisement

या पेव्हर ब्लॉकचं करायचं काय?


या पेव्हर ब्लॉकचं करायचं काय?
SHARES
Advertisement

कुंभारवाडा - अलंकार सिमेना येथील अनेक पेव्हर ब्लॉक उखडलेले आहेत. फुटपाथचे काम करण्यासाठी पेव्हर ब्लॉक काढण्यात आले आहे. पण चार महिने झाले हे काम अपूर्णच आहे. फुटपाथचे काम करण्यासाठी पेव्हर ब्लॉक काढून खोदकाम करण्यात आले. या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पण अजूनही तिकडे पेव्हर ब्लॉक, वाळू तशीच पडून आहे. 

यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांना धुळीचाही सामना करावा लागतो आहे. पालिकेने पेव्हर ब्लॉक न लावता फुटपाथवरील तुटलेले पेव्हर ब्लॉकचे तुकडे हटवून हा रस्ता स्वच्छ तरी करावा अशी मागणी दुकानदार आशिष वेल्लार यांनी केली. मात्र यासंदर्भात कंत्राटदाराने 'मुंबई लाइव्ह'शी बोलण्यास नकार दिला.

संबंधित विषय
Advertisement