Advertisement

पाटण मंडल एएलएमची पार्किंगच्या विळख्यातून सुटका कधी?


पाटण मंडल एएलएमची पार्किंगच्या विळख्यातून सुटका कधी?
SHARES

मुंबई शहरातील लोकप्रिय ठिकाण अशी मरीन ड्राईव्हची ओळख आहे. त्यामुळे या विभागाकडे सरकारी यंत्रणांचे बारकाईने लक्ष असते. विशेष म्हणजे या मरीन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस अशी उपमा आहे. ए आणि सी वॉर्डची हद्द इथे एकत्र येत असल्यामुळे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली जात होती. त्यावर उपाय म्हणून 2000 साली आपल्या विभागाकडे पालिकेचे लक्ष राहावे या करता अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट पाटण मंडल (एएलएम)ची स्थापना करण्यात आली.

एएलएम स्थापन केलेल्या या विभागात 28 इमारती येतात. ज्यात जवळपास 7 हजारांची लोकसंख्या आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पालिकेकडून वेळीच उचलला जातो. या परिसरात स्वच्छता असली तरी या विभागातील एफ लेनमध्ये असलेल्या मैदानाचा वापर स्थानिकांना करता येत नाही. या उच्चभ्रू लोकवस्तीत वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या आहे. ही वाहने पादचाऱ्यांना वापरासाठी असलेल्या फुटपाथवर उभी केलेली असतात. परिणामी त्यांना मुख्य रस्त्यावरून चालण्याव्यतिरिक्त पार्यायच उरत नाही. यासह या विभागात फायर हायड्रेंट असूनही त्याचा वापर होत नाही. या ठिकाणी एकीकडे निमुळता रस्ता आहे, त्यातच फुटपाथवर गाड्या पार्क केल्या जातात आणि हायड्रंट देखील चालत नसल्याने जर कधी आग लागली तर, अग्निशमन दलालाही येथील नागरिकांना वाचवणे अशक्य होईल, असे पाटण मंडल एएलएमचे सरचिटणीस निखिल बँकर यांनी सांगितले.

पालिकेच्या मदतीने स्थापन केलेल्या या एएलएमच्या माध्यमातून सुरुवातीला या ठिकाणी स्वच्छतेवर भर दिला गेला. परिसर स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी अनेक रहिवासी एएलएमशी जोडले गेले. पण काही काळानंतर त्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे दिवसेंदिवस या परिसरात विविध समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे तिथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे.

या विभागात एक धार्मिक स्थळ असून कबुतरांना तेथे नियमित खाद्य टाकण्यात येत असल्याने येथे कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एकप्रकारे हा परिसर कबुतरखानाच बनला आहे. याच परिसरात असलेल्या वेस्टर्न कोर्ट इमारतीतल्या रहिवासी मनिषा हाजी (52) यांना अस्थम्याचा त्रास आहे. त्यांचे सासरे रजनीकांत हाजी हे देखील अस्थमा या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे इतर रहिवाशांना हा आजार होऊ नये आणि विभागात हिरवळ कायम रहायला हवी यासाठी प्रत्येकाने त्यांच्या घरातील ओल्या कचऱ्यापासून खत बनवून त्याचा वापर परिसरातील झाडांसाठी करावा असे मनिषा हाजी यांनी सांगितले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा