मुलुंडमध्ये फुटपाथची दुरवस्था

 Dalmia Estate
मुलुंडमध्ये फुटपाथची दुरवस्था

मुलुंड - मुलुंड पूर्वेकडील मिठागर रोड तसेच नवघर रोड यांना जोडणाऱ्या फुटपाथची दुरवस्था झाली आहे. हा फुटपाथ गेल्या काही दिवसांपासून याच अवस्थेत आहे. तर, वारंवार तक्रार करुनही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक योगेश सावंत यांनी केला आहे. तर, 'मिठागर रोडच्या दुरुस्तीचं काम गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. टप्प्याटप्प्याने काम पूर्ण होईल तेव्हा या फुटपाथची देखील दुरुस्ती होईल, अशी माहिती नगरसेविका सुजाता पाठक यांनी दिली आहे.

Loading Comments