Advertisement

पालिकेने करून दाखवले, मुंबईत मुसळधार पाऊस मात्र हिंदमाता परिसरात साचलं नाही पाणी

दरवर्षी पावसात तलावाचं स्वरुप घेणाऱ्या हिंदमाता परिसरात यंदा पाणी साचलंच नाही.

पालिकेने करून दाखवले, मुंबईत मुसळधार पाऊस मात्र हिंदमाता परिसरात साचलं नाही पाणी
SHARES

 मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. पण यावर्षी माञ चमत्कारच झाला असं म्हणावं लागेल. कारण दरवर्षी पावसात तलावाचं स्वरुप घेणाऱ्या हिंदमाता परिसरात यंदा पाणी साचलंच नाही. या भागात पाणी न साचल्याने स्थानिकांना सुखद धक्का बसला आहे.

एवढंच नाही तर या ठिकाणाहून होणारी वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे. दुपारी 12.30 वाजेपर्यंत हिंदमाता परिसरात पाणी साचलं नव्हते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भरती असून मुसळधार पाऊस झाल्यास पाणी साचण्याची शक्यता आहे. 

मुंबई महापालिकेने या भागात साचलेले पाणी एका मोठ्या भूमिगत टँकमध्ये साठवण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या परिणामी या भागात पाणी साचले नाही. 

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, हिंदमाता, दादर गांधीनगर अशा सखल भागात मुंबई महापालिकेने भूमिगत टाक्या बनवल्या.  त्याचा फायदा झाला आहे. मागील वर्षी मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीचे हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. 

हिंदमाता येथील पावसाचे पाणी साठविण्यासाठी  महापालिकेकडून सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जलधारण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांची क्षमता 2.87 कोटी लिटर इतकी आहे.  पपिंग स्टेशन आणि भूमिगत पाण्याच्या टाकीमुळे पाण्याचा निचरा लवकर होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा