Advertisement

मुलुंडचं फोर्टिस रुग्णालय करणार रुग्णांचे पैसे परत!

१൦ जानेवारीला या सर्व प्रकारावर निर्णय घेऊ, असं फोर्टिस रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार, बुधवारी म्हणजेच १൦ जानेवारीला पुन्हा एकदा काही शिवसेना कार्यकर्त्यांनी फोर्टिस रुग्णालयाला भेट दिली आणि आपल्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली. त्यावेळी रूग्णालय प्रशासनाने पैसे परत करणार असल्याचे मान्य केले.

मुलुंडचं फोर्टिस रुग्णालय करणार रुग्णांचे पैसे परत!
SHARES

मुलुंडच्या फोर्टिस रूग्णालयामध्ये रूग्णांकडून अवाजवी दराने पैसे आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यसंदर्भात शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने रूग्णालय प्रशासनाची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. अखेर आता रूग्णालय प्रशासनाने आपली चूक कबूल करत रूग्णांचे पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेना कार्यकर्ते संजय माशीलकर यांनी ही माहिती दिली आहे.

१൦ जानेवारीला या सर्व प्रकारावर निर्णय घेऊ, असं फोर्टिस रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार, बुधवारी म्हणजेच १൦ जानेवारीला पुन्हा एकदा काही शिवसैनिकांनी फोर्टिस रुग्णालयाला भेट दिली आणि आपल्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली. त्यावेळी रूग्णालय प्रशासनाने पैसे परत करणार असल्याचे मान्य केले.


भोईर कुटुंबियांना दिला ५ लाखांचा चेक

१५ वर्षांच्या साहील भोईर या मुलावर ह्रदय प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, रुग्णालयात एक महिना उलटून गेला, तरी साहीलला ह्रदय उपलब्ध झालं नव्हतं. त्यानंतर डॉक्टरांनी सध्या ह्रदय प्रत्यारोपण करण्याची गरज नसल्याचं सांगितलं. तरीही त्याचं बिल ३५ लाखांच्या घरात गेलं.

या ३५ लाखांमधले ५ लाख रूपये साहीलच्या आई-वडिलांनी आपले आप्तेष्ट, शेजारी यांच्याकडून काही पैसे उसणे घेऊन जमा केले. पण, नंतर झालेल्या गोंधळामुळे रूग्णालय प्रसासनाने ५ लाखांचा चेक साहीलच्या कुटुंबियांना परत केला आहे. त्याशिवाय ३५ लाखांचं बिलही माफ करण्याचा निर्णय रूग्णालयाने घेतला आहे.


रूग्णांना भेटण्यासाठीही ५०० रूपये!

फोर्टिस रूग्णालय कशा प्रकारे अवाजवी बिल आकारून रूग्णांची लूट करत होते, याविषयीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. उपचारांसाठी दाखल रूग्णांना भेटण्यासाठीही फोर्टिसकडून ५०० रूपये आकारले जात असल्याचं समोर आलं होतं. तसेच, डॉक्टरांच्या एका विझिटसाठी ५०० रूपये याप्रमाणे दिवसभरात ३५ ते ४० विझिट्सचे पैसे आकारले जात होते. याशिवाय पार्किंसाठी १०० रूपये आकारले जात असल्याचंही समोर आलं होतं.

फोर्टिस रुग्णालयाने अवाजवी बिल आकारलेल्या रुग्णांना ५൦ टक्के रक्कम परत करण्याचं कबूल केलं आहे. शिवाय, 'यापुढे असं पुन्हा होणार नाही', अशी हमी देखील रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याच आठवड्यात याविषयी रुग्णालयाची मॅनेजिंग कमिटीसोबत पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. त्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यावर निर्णय घेतील.

अशोक पाटील, आमदार, शिवसेना



हेही वाचा

अबब! डेंग्यूच्या उपचारांचं बिल २१ लाख, मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयाचा प्रताप


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा