मुंबईत कु्त्ता बिर्याणी गँग पुन्हा सक्रिय?

 Goregaon West
मुंबईत कु्त्ता बिर्याणी गँग पुन्हा सक्रिय?
Goregaon West, Mumbai  -  

भटक्या कुत्र्यांचा त्रास मुंबईकरांना नवीन नाही. दिवसभर पायाशी घोळणारे, बिस्किटांसाठी जिभल्या चाटत मागेमागे येणारे नाक्यावरचे हेच भटके कुत्रे रात्रीच्या अंधारात बिस्कीट टाकणाऱ्याच्या अंगावरही दात ओठ खाऊन हल्ला करतात. तेव्हा त्यांच्या हल्ल्यातून बचावलेली व्यक्ती सकाळी उठून सर्वात पहिल्यांदा फोन लावते तो महापालिकेच्या कुत्रे पकडणाऱ्या विभागाला! महापालिकेकडून तक्रारींनुसार सकाळच्या वेळेत कुत्रे पकडण्याची मोहीम शहरभर राबवण्यात येते. परंतु गोरेगाव पश्चिमेकडील जवाहर नगर परिसरात बुधवारी चक्क रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुण महापालिकेच्या नावाचे टि-शर्ट घालून कुत्रे पकडत होते. ही बाब खटकल्याने येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांची चौकशी केल्यावर या तरुणांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा कु्त्ता बिर्याणी गँग सक्रिय झाली की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.


तरुणांनी घातले होते पालिकेच्या नावाचे टि शर्ट

बुधवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास 'मुंबई महापालिका आरोग्य विभाग' अशी पाटी असलेला जाळीबंद टेम्पो जवाहर नगरमध्ये येऊन थांबला. त्यातून उतरलेल्या 25 ते 35 वयोगटातील 7 ते 8 तरुणांनी हातात जाळी आणि पट्टे घेऊन भटके कुत्रे पकडण्यास सुरुवात केली. या सर्व तरुणांनी निळ्या रंगाचे टि शर्ट घातलेले होते. त्या टि शर्टवर इंग्रजीत 'डॉग कॅचर, बीएमसी' असे लिहिले होते.तरुणांकडे कुठलेही ओळखपत्र नव्हते  

या कुत्रे पकडणाऱ्या तथाकथित पालिकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यावर त्यांच्याकडे पालिकेचे कुठलेही ओळखपत्र किंवा कागदपत्र आढळले नाही. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अनंत सूद यांनी क्षणाचाही विलंब न लावता 100 नंबर डायल करुन, गस्त घालणाऱ्या मार्शलकडे यासंबधीची तक्रार नोंदवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालिकेत विचारणा केली असता पालिकेने असे कुठलेही कर्मचारी पाठवले नसल्याचे स्पष्ट केले.सहा महिन्यांपूर्वी कुत्ता बिर्याणीची बातमी व्हायरल

सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील बोरीवलीमध्ये कुत्र्याचे मांस वापरुन बिर्याणी बणविणाऱ्या टोळीची बातमी व्हायरल झाली होती. या कुत्रे पकडणाऱ्या तरुणांकडे पाहून पुन्हा एकदा अशा प्रकारची टोळी सक्रिय तर झाली नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्यावरचे अन्नपदार्थ, खासकरुन बिर्याणी खाणाऱ्यांनी सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे जाणकार सांगत आहेत.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

Loading Comments