चेंबुरमध्ये पोलिसांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिर

 Chembur
चेंबुरमध्ये पोलिसांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिर
Chembur, Mumbai  -  

जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने चेंबूरच्या आरसीएफ पोलिस ठाण्यात खास पोलिसांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.चेंबूर भाजपा युवा मोर्चा आणि ग्लोबल कॅन्सर केअर व्हिजन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेंबूर परिसरातील सर्वच पोलीस ठाण्यांमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी याठिकाणी हजेरी लावली. यावेळी येथील डॉक्टरांनी पोलिसांना कशा प्रकारे कर्करोग होतो, याची माहिती दिली. शिवाय पोलिसांना तंबाखू आणि सिगारेटपासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिला.

Loading Comments