Advertisement

वर्सोव्यात पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर


वर्सोव्यात पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
SHARES

पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन अंधेरीतील वर्सोवा पोलीस ठाण्यात करण्यात आले होते. अॅक्सिस मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या वतीने आयोजित या आरोग्य तपासणी शिबिरात विशेष तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली. या शिबिरात ईसीजी, लिपिड प्रोफाइल, ब्लड प्रेशर, रक्तातील साखर आणि बीएमआय, न्यूरोपॅथी चाचणी, फुफ्फुसाच्या फंक्शन टेस्ट, बॉडी फिट स्क्रिनिंग अशा बऱ्याच मोफत चाचण्या करण्यात आल्या. अॅक्सिस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे ऑर्थो, संचालक, डॉ. उमेश शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 70 कुटुंबांनी या शिबिरात सहभाग घेतला होता. 

कठोर काम आणि प्रचंड दबाव असूनही चांगले आरोग्य राखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे शिबीर फार महत्त्वाचे आहे. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून असे शिबीर भरवत आहोत. गेल्या वर्षी आम्ही मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत जवळपास 15 शिबिरे आयोजित केली होती, ज्यात शंभरहून अधिक कुटुंबांनी सहभाग घेतला होता.


डॉ. उमेश शेट्टी, संचालक, अॅक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

पोलीस कुटुंबातील 400 हून अधिक सदस्यांना या शिबिराचा फायदा होणार आहे. येत्या 9 मे रोेजी डी. एन. नगर. पोलीस ठाणे येथे पुढील शिबीर असणार आहे. या शिबिरातून पोलिसांना 1500 रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा