गोवंडी- मानखुर्द परिसरात मोफत आरोग्यसेवा

 Mumbai
गोवंडी- मानखुर्द परिसरात मोफत आरोग्यसेवा
Mumbai  -  

गोवंडी आणि मानखुर्द परिसर हा सर्वाधिक झोपडपट्टी परिसर असून, या परिसरात नेहमी साथीच्या अाजारांचे थैमान असते. त्यातच या परिसरात एकही सरकारी रुग्णालय जवळ नसल्याने येथील रहिवाशांना सायन किंवा राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. मात्र सध्या या परिसरात गरीब लोकांसाठी एक संस्था घरपोच मोफत आरोग्य सेवा देत आहे. 'इंडिया बुल्स फाऊंडेशन' असे या संस्थेचे नाव असून, या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू रुग्णांची नियमित मोफत वैद्यकिय तपासणी आणि मोफत औषधोपचार केला जात आहे. या शिवाय दरमहा विविध आजारांनी त्रस्त हजारो रुग्ण या आरोग्यसेवेचा लाभ घेत आहेत. 'तांबोळी वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष जमीरभाई तांबोळी आणि समाजसेवक सत्तार खान यांच्या संकल्पनेतून याठिकाणी ही सेवा सुरू असून, याचा फायदा येथील गरीब जनतेला मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मत सिराज खान या रहिवाशाने व्यक्त केले आहे.

Loading Comments