गरीब आणि गरजू शालेय विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून मोफत वह्या वाटपाचा उपक्रम 4 जून रोजी सायनच्या डॉ. आंबेडकर रोड येथील मुरलीधर मंदिर हॉल येथे राबवण्यात आला. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वॉर्ड क्र. 172 च्या नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 'पुष्पगुच्छ न देता त्याऐवजी वह्या देऊन आपले अभिनंद करा', असे सांगून हा एक संकल्प हाती घेतला होता अशी माहिती शिरवाडकर यांनी दिली. जमा झालेल्या वह्या जूनमध्ये शाळा सुरू होण्याआधी गरजू विद्यार्थांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.
तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या संकल्पातून एकूण 18000 वह्या जमा झाल्या आणि त्यांचे वाटप विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले. वह्या-पुस्तके ही शालेय जीवनात अत्यंत उपयोगी वस्तू आहे. त्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे असल्याच पाहिजेत, या अनुषंगाने या संकल्पाचे आवाहन करण्यात आले. त्याची योग्य आणि उत्तम रीतीने पूर्तता झाल्याचे यावेळी शिरवाडकर यांनी स्पष्ट केले.
