माजी नगरसेवकांना मोफत बेस्ट पास कशाला?

    मुंबई  -  

    मुंबई - तुमच्या आमच्या सारख्या करदात्यांचा विरोध असला तरी माजी नगरसेवकांनाही बेस्टचा मोफत पास देण्याचा घाट घातला जातोय. तशा प्रस्तावाला महापालिकेच्या सभागृहात मान्यताही देण्यात आली आहे. शेख यांनी माजी नगरसेवकांना मोफत बेस्टपास मिळावा, अशी ठरावाच्या सुचनेद्वारे मागणी केली होती. या सुचनेला भाजपने विरोध केला, मात्र काँग्रेस, समाजवादी पार्टीने बाजूने कौल दिल्याने महापौर स्नेहल आंबेकर यांनी ठरावाची सूचना मंजूर केली.शेख यांनी पासचा आर्थिक भार पालिकेने उचलायची मागणी केलीय. त्यामुळे आता माजी नगरसेवकांनाही बेस्टने मोफत प्रवास करायला मिळेल. पण या सुविधेची किती माजी नगरसेवकांना खरोखरच गरज आहे, हा प्रश्न मात्र कोणालाच पडलेला नाहीये.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.