Advertisement

'फ्रेंड्स ऑफ दादर ग्रुप'कडून फेरीवाला मुक्त दादरसाठी शपथ मोहीम


'फ्रेंड्स ऑफ दादर ग्रुप'कडून फेरीवाला मुक्त दादरसाठी शपथ मोहीम
SHARES

अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचे आदेश असताना, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन त्यांच्याविरोधात काहीच कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित करत फ्रेंड्स ऑफ दादर या एनजीओने एक अनोखा उपक्रम राबवला. या अनधिकृत फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी या सामाजिक संस्थेसह दादरमध्ये रविवारी काही लोकांनी एकत्र येऊन फेरीवाल्यांकडून काहीही खरेदी करणार नसल्याची शपथ घेतली. या उपक्रमाला दादारकरांनी एकत्र येत प्रचंड पाठिंबा दिला.


'हा नक्कीच दादारकरांचा विजय'

पूर्वी फेरीवाले असताना दादर स्टेशनजवळ चालायची सोय नव्हती. आता फेरीवाले मुक्त दादर झाल्यानंतर बेस्टने त्या ठिकाणी बस सुरू केली आहे. एवढा स्वच्छ मोकळा रस्ता दादारकरांना वापरायला मिळत आहे. हा नक्कीच दादारकरांचा विजय आहे. अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास सर्वात जास्त प्रमाणात दादरकरांना सहन करावा लागतो. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांकडून वस्तूच खरेदी करायच्या नाहीत, अशी शपथ 'फ्रेंड्स ऑफ दादर' या एनजीओच्या सदस्यांनी घेतली. त्याच बरोबर इतरांनी देखील खरेदी करू नये, असे आवाहन केले. 'फ्रेंड्स ऑफ दादर' ही संस्था गेली 3 वर्षे दादरमध्ये कार्यरत असून अनेक दादारकरांनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केली आहे.


गेल्या काही वर्षात दादरमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. याचा त्रास निश्चितच दादरच्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे. इतर विक्रेते दादरच्या विक्रेत्यांकडून खरेदी करत असल्यामुळे या ठिकाणच्या विक्रेत्यांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे आज आम्हाला अशी शपथ घ्यावी लागली आहे.

- अनुप भिंगार्डे, सदस्य, फ्रेंड्स ऑफ दादर ग्रुप

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा