Advertisement

एपीएमसी मार्केटमध्ये ५३ टक्क्यांनी घटली भाजीपाल्यांची आवक

लॉकडाऊनमुळं भाजीपाल्यालाही फटका बसला आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये ५३ टक्क्यांनी घटली भाजीपाल्यांची आवक
SHARES

कोरोनामुळं राज्यात लॉकाडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊमुळं अनेक सुविधांना फटका बसत असून, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता लॉकडाऊनमुळं भाजीपाल्यालाही फटका बसला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मधील भाज्याची व फळांची आवक गतवर्षीच्या तलनेत ५३ टक्क्यांनी घटली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळानं माहिती दिली आहे. परिणामी यामुळं थेट शेतकऱ्याच्या नुकसानात वाढ झाली आहे.

दररोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या बटाटा आणि कांद्याची बाजारातील आवक ४९.४ टक्क्यांनी घटली आहे. एकूण आवक ३५ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. २५ मार्च ते २९ मे या लॉकडाउनच्या कालावधीततील आकडेवारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार अन्नधान्याची आवक ही घटली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेकदा मार्केट बंद असल्यामुळं शेतकऱ्यांना मालाची विक्री करता आली नाही. वाहतुकदारांनी भाडेवाढ केल्यानं खर्च वाढला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात भाजीपाला खराब झाला आहे. यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या नुकसाला सामोरं जावं लागत आहे. त्याशिवाय, अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला. लॉकडाऊनच्या कालावधीत बाजारपेठ बंद करणे, खासगी व्यापारातील घट यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.



हेही वाचा -

सरकारनं मदत न केल्यास शालेय बस संघटनेचा आंदोलनाचा इशारा

गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यास मानाई



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा