Advertisement

तुम्ही कपड्यांच्या पावडरमध्ये धुतलेले सफरचंद खाताय!


SHARES

घातक रसायनांचा वापर करुन वेळेआधीच पिकवलेली फळं, फ्रेश दिसण्यासाठी त्यांना लावण्यात येणारी रसायनं, त्यामुळे फळांच्या मूळ जीवनसत्वांचं होणारं नुकसान आणि अशी फळं खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम. या आणि अशा अनेक चर्चा आपण आजवर केल्या, पाहिल्या आणि ऐकल्या असतील. पण सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हीडिओमुळे हा सगळा प्रकार याहून पुढे गेल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.

हा व्हीडिओ नक्की किती जुना आहे याविषयी निश्चित माहिती मिळू शकलेली नसली, तरी व्हीडिओमध्ये दिसणारं वास्तव मात्र धक्कादायक आहे. दादरच्या फळमार्केटमध्ये एका ग्राहकाने शूट केलेल्या या व्हीडिओमध्ये एक फळ विक्रेता चक्क कपडे धुवायच्या पावडरच्या पाण्यात सफरचंद धुवत असल्याचं दिसत आहे. ही पावडर पोटात गेल्यास आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. मात्र हा फळविक्रेता अगदी बिनधास्तपणे ही फळं पावडरच्या पाण्यात धुवून काढतोय. मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा विक्रेत्यांवर एफडीएची नजर कधी पडणार? असाच प्रश्न सामान्य मुंबईकरांकडून विचारला जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा