स्वामी गगनगिरी महाराजांच्या आश्रामतील दीपोत्सवाची जागतिक विक्रम म्हणून नोंद

 Manori
स्वामी गगनगिरी महाराजांच्या आश्रामतील दीपोत्सवाची जागतिक विक्रम म्हणून नोंद
Manori, Mumbai  -  

विश्व शांती आणि मानव कल्याणाची ओळख असलेल्या स्वामी गगनगिरी महाराजांच्या मनोरी, मालाड येथील आश्रमात कोजगारी पौर्णिमेला साजरा करण्यात आलेल्या दीपोत्सवाची नोंद विश्वविक्रम म्हणून झाली आहे.

या आश्रमात 2016 ला कोजागरी पौर्णिमेला लक्ष लक्ष दीपोत्सव सोहळा-2016 साजरा करण्यात आला होता. यावेळी आश्रमातील स्वयंसेवकांनी 1 लाख 51 दिवे आश्रमात लावले होते. संपूर्ण आश्रम परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता. त्याची दखल वर्ल्ड  रेकॉर्डस इंडियाने घेत याची जागतिक विश्व विक्रमात नोंद झाल्याची माहिती सह समन्वयक संजय विलास नार्वेकर आणि रवींद्र नार्वेकर यांनी दिली. हा दीपोत्सव दिवंगत अमृतराव पाटणकर यांच्या संकल्पनेतून आणि निषाद पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

Loading Comments