Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या, गणेशोत्सव काळात वाहतूक मार्गात बदल

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या, गणेशोत्सव काळात वाहतूक मार्गात बदल
SHARES

मुंबईसह (Mumbai) राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणरायाचं आगमन केलं जात आहे. तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा केला जात आहे. आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) गणेशोत्सवासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

दीड दिवसाच्या विसर्जनानंतर तीन दिवस, पाच दिवस, गौरी गणपती, सात दिवसांचे गणपती, तर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाचं विसर्जन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 1, 4, 5, 6 आणि 9 सप्टेंबर रोजी विसर्जन केलं जाणार आहे. त्यानिमित्त वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.

मुंबईकरांची सुरक्षितता लक्षात घेऊन तसेच, गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गांमध्ये बदल केला जाणार आहे.

दादर, माहीम, सायन, माटुंगा, परळ, लालबाग, भायखळा येथील काही ठिकाणांवरील वाहतूक पर्यायी ठिकाणांवरून वळवण्यात आली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी सोमवारी एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्यानुसार, 1 सप्टेंबरपासून सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवजड वाहतांना काही ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, "ग्रेटर मुंबईमध्ये 1 सप्टेंबर, 4, 5 आणि 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आणि 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत रस्त्यांवर अवजड वाहानांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे."

"बृहन्मुंबईतील वाहतूक कोंडी, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि गणपती मिरवणुका सुरळीत ठेवण्यासाठी, 1, राज टिळक रोशन, LPS. पोलीस उपायुक्त (11.प्र. आणि मध्य) वाहतूक, मुंबई कवायतीत बॉम्बे मोटार व्हेईकल ACI-1988 (1988 चा कायदा 39) च्या कलम-115 अन्वये मला बहाल केलेला अधिकार, 19 मे 1990 रोजीच्या सरकारी अधिसूचना क्रमांक MVA 0589 CRR-1061/TRA-2 सह वाचलेला आदेश खालीलप्रमाणे आहे,"  असं सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा

मुंबईतील 'हे' १३ पूल धोकादायक, गणेश मंडळांना पालिकेचे आवाहन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा