Advertisement

गणेशोत्सवासाठी वेतन लवकर देण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच यंदाचा गणेशोत्सव आनंदात जावा यासाठी अंगणवाडी सेविकांनी ऑगस्टचे वेतन लवकर देण्याची मागणी केली आहे

गणेशोत्सवासाठी वेतन लवकर देण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी
SHARES

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच यंदाचा गणेशोत्सव आनंदात जावा यासाठी अंगणवाडी सेविकांनी ऑगस्टचे वेतन लवकर देण्याची मागणी केली आहे. तसंच, मार्च महिन्यापासूनचे अंगणवाडी केंद्राचं थकीत भाडं, मोबाइल रिचार्ज आणि इतर प्रशासकीय खर्च देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

२ लाख कर्मचारी

राज्यभरात जवळपास २ लाख अंगणवाडी महिला कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना या वर्षांचं मोबाइल रिचार्ज, गणवेश इत्यादी पैसे अजून शासनाकडून प्राप्त झालेले नाही आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने ऑगस्टच्या वेतनासह हे पैसेही तातडीने द्यावेत, अशी मागणी केली आहे.

मागण्यांसाठी आंदोलन

दरम्यान, अंगणवाडी कर्मचारी बुधवारी नवी मुंबईतील रायगड भवन येथे आंदोलन करणार आहेत. मार्च महिन्यापासूनचे अंगणवाडी केंद्राचं थकीत भाडं, मोबाइल रिचार्ज आणि इतर प्रशासकीय खर्च इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करणार आहेत.



हेही वाचा -

उद्धव ठाकरेंची मध्यस्ती निष्फळ, बेस्ट कामगारांचे बेमुदत उपोषण सुरु



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा