Advertisement

येथील उड्डाणपुलांखाली उभारणार ९ उद्यानं


येथील उड्डाणपुलांखाली उभारणार ९ उद्यानं
SHARES

महापालिकेच्या उद्यान विभागाने पूर्व उपनगरांमधील विविध ठिकाणच्या उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत नऊ उद्यानं उभारण्याचं प्रस्तावित केलं आहे. या ९ उद्यानांमध्ये विविध झाडं, बसण्याकरता बाक, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी आणि कुंपण बसवण्यात येणार आहे. तसंच उद्यानं अधिक आकर्षक करण्यासाठी हेमालिया, दुरांटा, प्लंबॅगो, माल्पिजिया, अॅकॅलिफा, क्रोटॉन, बोगनवेल, सप्लेरा, फायकस, अॅकेरा पाम आणि इक्झोरा यांसारखी विविध झाडे लावण्यात येणार आहेत. 


खर्च किती?

या उद्यानाच्या उभारणीसाठी ७ कोटी ३३ लाख रुपये इतका अंदाजित खर्च येणार आहे. याबाबतची निविदा अंतिम टप्प्यात आहे. निविदा पूर्ण झाल्यावर आणि स्थायी समितीच्या मंजुरीनंतर कार्यादेश देण्यात येणार आहे. कार्यादेश दिल्यानंतर पुढील ३ ते ४ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याचं अपेक्षित आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.


'येथे' उभारणार उद्यान

  • 'एल' विभागातील सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील (SCLR) उड्डाणपुणाखाली असणाऱ्या १० हजार २२५ चौरस फुटांच्या जागेत उद्यानांसह सौंदर्यीकरण केलं जाणार आहे.
  • 'एम' पूर्व विभागातील मानखुर्द टी जंक्शन येथे शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाखील ७९ हजार २५४ चौरस फुटांच्या जागेमध्ये हे उद्यान उभारण्यात येणार आहे. 
  • गोवंडी परिसरातील बोर्बा देवी चौकाजवळील सुमारे १७ हजार २२२ चौरस फुटांच्या जागेमध्ये उद्यान उभारण्यात येणार आहे. 
  • वाशी नाका परिसराजवळ असणाऱ्या रामकृष्ण चेंबुरकर मार्ग उड्डाणपुलाखाली ११ हजार ८४० चौरस फुटांच्या जागेत उद्यान उभारण्यात येणार आहे. या उद्यानाच्याभोवती संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. 
  • अमर महाल जंक्शन उड्डाणपूलाखालील ३७ हजार ६७३ चौरस फुटांच्या जागेमध्ये उद्यान उभारण्यात येणार आहेत. 
  • अंधेरी घाटकोपर लिंक रोडवरील (AGlR) मेट्रोच्या पुलाखालील वेगवेगळ्या ४ ठिकाणी छोटे बगीचे उभारण्यात येतील.
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा