
आधीच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलनंतर एलपीजी गॅस सिलेंडर म्हणजेच स्वयपाकाच्या गॅसच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.
अनुदानित गॅस सिलेंडर 2 रुपये 34 पैशांनी आणि विनाअनुदानित सिलेंडर 48 रुपयांनी महागला आहे. दरवाढीनंतर आता मुंबईत अनुदानित सिलेंडर 491.31 रुपयांनी, तर विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलेंडर 671.50 रुपयांनी मिळणार आहे. अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत दोन महिन्यांनी आणि विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत सहा महिन्यांनंतर वाढवण्यात आली आहे.
प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी अनुदानित किमतीतील 12 गॅस सिलिंडर उपलब्ध केले जातात. या कोट्यापलीकडील सिलिंडर बाजारभावानुसार खरेदी करावा लागतो. त्यामुळे विनाअनुदानित सिलेंडरसाठी अधिक किंमत मोजावी लागते.
हेही वाचा -
