Advertisement

बदलापूर MIDCत वायू गळती, नागरिकांना श्वास घेण्यास त्रास

बदलापूर एमआयडीसी परिसरात केमिकल वायूची गळती (Chemical Gas leak) झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

बदलापूर MIDCत वायू गळती, नागरिकांना श्वास घेण्यास त्रास
SHARES

बदलापूर एमआयडीसी (Badlapur MIDC) परिसरात केमिकल वायूची गळती (Chemical Gas leak) झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या वायू गळतीमुळे स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. इतकेच नाही तर काही नागरिकांना उलट्या, पोटात मळमळ होण्याचाही त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे.

बदलापूर एमआयडीसी भागात वायू गळती झाल्यानं नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. या वायू गळतीमुळे शिरगांव, आपटेवाडी या परिसरातील अनेक रहिवाशांना श्वसनाचा त्रास झाला. तर काहींना उलट्या आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला. या भागात हवेत हा वायू पसरला होता. यासंबंधीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी संबंधित परिसराची पाहणी केली.

वायू गळती झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. बदलापूर शहरातील शिरगाव, आपटेवाडी भागातील नागरिकांना हा त्रास जाणवत आहे.

एमआयडीसी भागातील नोबल इंटर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून या वायूची गळती झाली आहे. कंपनीमध्ये एका रिॲक्टरमध्ये क्रुड ऑईल साठीच सल्फ्युरिक ॲसिड आणि बेंझाईन डिहायड्रेड या दोन केमिकल्स मिश्रण सुरू होतं. मात्र त्यासाठी लागणारा तापमान नियंत्रित करताना चूक झाल्यानं या रिॲक्टरमधून वायुगळती झाली.

मात्र हा वायू ज्वलनशील नाही, श्वास घेण्यास हा वायू त्रासदायक ठरणारा आहे. त्यामुळे त्वचा, डोळे,यांना काही प्रमाणात बाधा करणारा आहे.



हेही वाचा

ठाण्यात हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटमध्ये दोन अभिनेत्रींना अटक

मुंबई महापालिकेतील सॅप प्रणाली ११ ते २८ जूनपर्यंत बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा