ठाण्यात हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटमध्ये दोन अभिनेत्रींना अटक

या सेक्स रॅकेटची लिंक मुंबईतील (mumbai) अनेक मोठ्या अभिनेत्रींशी असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी आता ठाणे क्राईम ब्रांच (thane Crime Branch) आरोपींची कसून चौकशी करत आहे.

ठाण्यात हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटमध्ये दोन अभिनेत्रींना अटक
SHARES

ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्‍स रॅकेट (high profile sex racket) चा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे क्राईम ब्रांच (thane Crime Branch) ने दोन अभिनेत्रींना अटक (actress arrested) केली आहे.

ठण्यातील एका खासगी सोसायटीत हाय प्रोफाईल सेक्‍स रॅकेट सुरू असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांच युनिट १ (Thane Crime Branch Unit 1) ला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी ३ एजंटसह दोन अभिनेत्रींना पोेलिसांनी अटक केली आहे. बॉलिवूडशी संबंधीत या दोन्ही अभिनेत्री आहे. लाखो रुपये घेऊन या अभिनेत्री वेश्या व्यवसाय करत होत्या.

सोसायटीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटम (high profile sex racket) ध्ये दोन अभिनेत्रींचा समावेश असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. कोरोना (coronavirus) काळात चित्रिकरण बंद असल्याने या दोन्ही अभिनेत्री वेश्‍या व्यवसायाकडे वळाल्या, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. 

या सेक्स रॅकेटची लिंक मुंबईतील (mumbai) अनेक मोठ्या अभिनेत्रींशी असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी आता ठाणे क्राईम ब्रांच (thane Crime Branch) आरोपींची कसून चौकशी करत असून यामागे एक मोठं रॅकेट असल्याची पोलिसांना शंका आहे.



हेही वाचा -

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, किचनमध्ये पुरला मृतदेह

गुरुवारी मुंबईतील लसीकरण बंद, 'या' दिवशी मिळणार लस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा